मुंबई |किरीट सोमय्या हे माजी खासदार आहेत. त्यांच्या बोलण्याला त्यांचा पक्षही गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्यांनी खोटेनाटे आरोप करणं थांबवावं, असं शिवसेना खासदार संजय राऊतांनी म्हटलंय.
जुनी थडगी आम्हालाही उकरता येतात. पण मागचं विसरुन पुढे जावं ही आमची भूमिका असते. आम्हीही जुनी थडगी उकरली तर तुमच्या पापाचे सांगाडेच सापडतील, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिलाय.
आम्ही बोलावं असं महान कार्य त्यांनी केलं नाही. ते माजी खासदार आहेत. त्यांनी त्यांचं काम करावं. त्यांना त्यांचा पक्षही गंभीरपणे घेत नाही. ते जे बोलतात त्यामुळे त्यांच्याच पक्षाची विश्वासहार्यता कमी होत आहे. याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
विरोधकांनी गेले वर्षभर अनेक ऑपरेशन केले. पण या सरकारला साधं खरचटलं सुद्धा नाही. मागील वर्षी विरोधकांनी अनेक अघोरी प्रयोग करण्याचे प्रयत्न केले. पण आम्ही त्यांना पुरून उरलो. त्यामुळे त्यांनी आता ऑपरेशनची भाषा बंद केली पाहिजे, असं राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
नितीश कुमारांनी दिला राजीनामा, नेता निवडीसाठी एनडीएची उद्या बैठक
सुशांतला मी बिहारचा मानत नाही, तो मुंबईचाच- संजय राऊत
भाजपसोबत आमचा भावनिक बंध होता, 25 वर्षांचं नातं तोडताना खूप दु:ख झालं- संजय राऊत
…अन्यथा शिवसेनेकडे तुमच्या घरावर फेकण्यासाठी खूप दगड आहेत- संजय राऊत
जुनी थडगी उकरली तर तुमच्याच पापाचे सांगाडे दिसतील- संजय राऊत