बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हे ही दिवस जातील, अपना टाईम भी आयेगा’, पवारांवरच्या छापेमारीवर संजय राऊत म्हणाले…

मुंबई | कालपासून अजित पवारांचे निकटवर्तीय आणि संबंधित लोकांवर आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. तर पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पाॅईंटच्या कार्यालयातही छापेमारी करण्यात आली. त्यानुसार आता या छापेमारीमुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत असल्याचं दिसून येत आहे.

शिवसेनेचे नेेते संजय राऊत यांनी हे सु़डाचं राजकारण असल्याचं म्हणत एखाद्या राजकीय कुटूंबावर राजकीय रागापोटी होत असलेली छापेमारी ही दहशत निर्माण करणारी आहे. तसेच हे ही दिवस जातील आणि दिल्लीत आमचेही दिवस येतील, अपना टाईम भी आयेगा, अशा शब्दात राऊतांनी या छापेमारीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सध्या संपुर्ण राज्यभरात अजित पवारांच्या बहिणीवर आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर झालेल्या कारवाईचीच चर्चा सुरू आहे. त्यातच राजकीय वर्तुळात मात्र मोठ्या प्रमाणात टिका होत असून ही छापेमारी सुडबूद्धिने होत असल्याचा आरोपही केला जात आहे. त्यामुळे या कारवाईनंतर आता नेमकं काय निष्पन्न होणार? हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

याचबरोबर येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढेल, असं देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुंबईत आता पुन्हा एकदा शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिल्याने नेहमीप्रमाणे यंदाही मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या

MI vs SRH: प्ले-ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी मुंबईला खेळावी लागणार अफलातून खेळी

मुंबईकरांनो सावधान! कोरोना रुग्णांची पुन्हा होतीये झपाट्याने वाढ

अजित पवार आयकर विभागाच्या रडारवर; आतापर्यंत कुठे कुठे पडल्या धाडी?

देशातील सक्रिय कोरोना रूग्णसंख्येत 205 दिवसातील निच्चांकी नोंद

काय सांगता! गॅस सिलेंडर बुकींगवर चक्क मिळतंय सोनं

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More