महाराष्ट्र मुंबई

भक्त मंडळी सध्या रिकामटेकडी, कोरोना युद्धाच्या धुरावर स्वत:च्या भाकरी शेकवीत आहेत- संजय राऊत

मुंबई |  शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखामधून भाजपचा खरपूस समाचार घेतला आहे. तसंच पालघर केसवरून जे कुणी राजकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत किंवा करत आहेत त्यांच्यावर देखील त्यांनी आजच्या अग्रलेखातून आसूड ओढले आहेत.

पालघरमधील साधूंची हत्या हा माणुसकीला कलंक आहे. त्याचे राजकारण कोणी करू नये, पण भक्तमंडळी सध्या रिकामटेकडी बसली आहेत व कोरोना युद्धाच्या धुरावर स्वत:च्या भाकऱया शेकवीत आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसारख्या राज्यांत ‘लॉक डाऊन’मुळे भूकबळी व त्यातून झुंडबळी सुरू झाले. यावर एखादे चॅनल त्याचे ते डिबेट की काय ते का करत नाही व भक्त मंडळही तोंडाचे लॉकडाऊन करून गप्प का बसले आहेत?, असा सवाल त्यांनी केला आहे.

पालघरमधील साधूहत्येने महाराष्ट्राच्या इभ्रतीस धोका पोहचला हे खरेच आहे पण ज्या राज्यात गरीब अन्नासाठी बाहेर पडतो तसंच डॉक्टर सेवेसाठी बाहेर पडतो आणि त्यांना मारहाण होते, अशावेळी त्या राज्याची काय इभ्रत वाढते काय? असं म्हणत त्यांनी हा प्रसंग जिथे घडला त्या उत्तर प्रदेश राज्याचं उदाहरण देऊन भाजपवर निशाणा साधला आहे.

दुसरीकडे, पत्रकार अर्णब गोस्वामीचं नाव घेता त्यांनी त्यावर जोरदार टीका केली आहे. एखादा पत्रकार धर्मिक तेढ निर्माण करत असेल तर मोदी सरकारने त्याची मान्यता रद्द केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर ही पत्रकारिता समाजविरोधी असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-

“उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्याचीच चाल”

महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या 14 वरून 5 वर- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

बीड जिल्हा कोरोनामुक्त; धनंजय मुंडेंकडून जिल्हावासियांचं कौतुक

रेशनचा काळा बाजार करणाऱ्यांना छगन भुजबळांचा दणका; केली मोठी कारवाई

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या