महाराष्ट्र मुंबई

अरे बापरे.. मला भीती वाटतेय, त्यांनी तात्काळ पत्रं लिहावं- संजय राऊत

मुंबई | औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर ‘सामना’तून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली त्याबाबत मी ‘सामना’च्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बापरे, चंद्रकांतदादा पत्रं लिहिणार आहेत. मला भीती वाटतेय, त्यांनी तात्काळ पत्रं लिहावं, असा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

चंद्रकांतदादा ‘सामना’ वाचतात ही चांगली गोष्ट आहे. कालपर्यंत ते ‘सामना’ वाचत नव्हते. आज वाचतात. चांगलं आहे. त्यांनी ‘सामना’ रोज वाचला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होईल, अशी बोचरी टीका राऊतांनी केली.

रोज पेपर वाचत राहिले तर आघाडी सरकार पाच वर्षे कायम राहणार असल्याचा विश्वासही त्यांच्या मनात निर्माण होईल, असा चिमटाही संजय राऊत यांनी काढला.

थोडक्यात बातम्या-

कोरोना लसीसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

आपण आजन्म आमदार, खासदार असल्याच्या थाटात राहून चालत नाही- देवेंद्र फडणवीस

नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक ‘स्वीकारार्ह’ नेते; ‘मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणाचा दावा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरदार बुटा सिंग यांचं निधन

‘जमत नसेल तर…’; नवनीत राणा यांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या