मुंबई | शिवसेना आणि भाजप राजकारणात 25 वर्षे एकत्र होते. त्यामुळे भाजपसोबत आमचा भावनिक बंध तयार झाला होता. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नवे घर थाटत असताना आम्हाला खूप दु:ख झाले होते, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत शुक्रवारी रात्री यू ट्यूबवर प्रसारित करण्यात आली. यामध्ये संजय राऊत यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेकांना विश्वास बसत नव्हता. उद्धव ठाकरे खरंच मुख्यमंत्री झाले आहेत का, हे लोकांना खरं वाटत नव्हतं, असं राऊत म्हणाले.
आपण स्वप्नात तर नाही आहोत ना हे तपासण्यासाठी लोक स्वत:लाच चिमटा काढून बघत होते, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
जुनी थडगी उकरली तर तुमच्याच पापाचे सांगाडे दिसतील- संजय राऊत
दिवाळीला ‘सॅल्यूट टू सोल्जर’ म्हणून एक दिवा लावूया; पंतप्रधान मोदींचं आवाहन
संघाच्या पथसंचलनाविरुद्ध हायकोर्टात याचिका; काठ्या बाळगण्यावर आक्षेप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा जैसलमेर सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी करणार!