Top News महाराष्ट्र मुंबई

“आम्हाला मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय, ‘आपल्यासाठी संभाजीनगर आणि संभाजीनगरच राहणार'”

मुंबई | एकीकडे भाजपकडून वारंवार औरंगाबादच्या नामंतराची मागणी होत आहे तर दुसरीकडे काँग्रेस जाहीरपणे आपला विरोध दर्शवत आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या पेचात पडली असताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी आपल्या मागणीवर ठाम असल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आपल्यासाठी औरंगाबाद नव्हे, तर संभाजीनगरच आहे आणि संभाजीनगरच राहणार असल्याचं संजय राऊत म्हटलं आहे.

औरंगाबादचं नामांकरण हा लोकांच्या भावनेचा विषय आहे त्यामुळे आपण चर्चा करू शकतो पण निर्णय घेण्यात आला आहे, असं जाहीरपणे राऊतांनी सांगितलं आहे. याच मुद्यावरून आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

दरम्यान, औरंगाबादचे नामांतर केल्यानं मुस्लिम समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील आणि व्होट बँकेवर परिणाम होईल. म्हणजे स्वत:च्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्चचिन्ह निर्माण होईल, असं  म्हणत राऊत यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

कंपाऊंडर डोक्यावर पडलेत का?- संदीप देशपांडे

“धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता”

शार्दुल आणि वाशिंग्टनने केली कांगारूंची बोलती बंद! सुंदरने केला 110 वर्षानंतर ‘सुंदर’ विक्रम

‘बिग बॉस14’ मधील पिस्ता धाकडचा व्हॅनिटी व्हॅनखाली चिरडून मृत्यू

“महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या