Top News

माझं ते माझं तुझं ते माझ्या बापाचं असं भाजपचं राजकारण आहे- संजय राऊत

मुंबई | भाजपवाले दिलेला शब्द पाळणार नाही याची सर्वात आधी खात्री मला होती. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावरच हे मला कळलं होतं. माझं ते माझं तुझं ते माझ्या बापाचं आहे असं भाजपचं राजकारण सुरु आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

लोकमत आयोजित पुरस्कार कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी दिलखुलास बातचीत केली. माणूस मृत्यूला किंवा तुरुंगात जायला घाबरतो. पण मी कशालाही घाबरत नाही. त्यामुळे कुणालाही घाबरण्याचा प्रश्नच येत नाही, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

पक्षाला शिवसेना नाव ठेवताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारणा केली होती का?, अशी टीका माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती. यासंदर्भात प्रश्न विचारले असता त्यांनी उदयनराजेंवर पलटवार केला आहे. उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे, असं त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मी पत्रकारीतेत आलो. मला पत्रकार म्हणवून घेण्यास आवडतं. पत्रकारीतेत असताना मुंबईतील गॅगवाॅर जवळून पाहता आला. मी गँगस्टर दाऊद इब्राहिमला सुद्धा दम भरलाय, असं राऊत म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

संबंधित बातम्या-

नवाब मलिकांच्या भावाविरोधात पोलिसात तक्रार नोंदवणार; भाजप आक्रमक

उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावे- संजय राऊत

मी दाऊद इब्राहिमला सुद्धा दम भरलाय, हिंमत असेल तर अंगावर या- संजय राऊत

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या