बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांचं पंतप्रधान मोदींना आवाहन, म्हणाले…

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेकडून (Shivsena) सडकून टीका केली जात आहे.

राज ठाकरेंच्या मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्याला भाजपची (BJP) साथ असल्याचं दिसत असताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीका केली आहे. तर राज्यातील हा वाद निकाली लावण्यासाठी संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) आवाहन केलं आहे.

तुमच्या लोकांनी हा लाउडस्पीकरचा वाद उभा केला असून हा वाद मिटवण्यासाठी एक राष्ट्रीय धोरण बनवण्याची गरज आहे. तसेच त्याची संपूर्ण देशात अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचंही संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, केंद्र सरकराने भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरण ठरवावे. सर्वात आधी त्याची बिहार, गुजरात, दिल्लीत अंमलबजावणी करावी आणि महाराष्ट्रातही हे धोरण लागू करावं, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत त्यानूसार आमचे सरकार काम करत आहे. त्यामुळे आम्हाला कोणीही अक्कल शिकवण्याची गरज नाही, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

Netflix ला मोठा झटका! ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

‘मी एसटी संपकऱ्यांकडून पैसे घेतल्याचं मान्य करतो’; सदावर्तेंची कबुली

“तुमच्यासारख्या तात्या विंचूचा राजसाहेब ओम फट स्वाहा करणार”

मोठी बातमी ! ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Russia-Ukraine War| रशियाचं युक्रेनियन सैन्याला अल्टिमेटम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More