बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…मग संविधान पाळण्याचं नाटक कशासाठी?”, राऊतांचा खोचक सवाल

नवी दिल्ली | आज संविधान दिनानिमित्त ( Constitution Day ) आज संसदेच्या (Parliment) सेंट्रल हॉलमध्येही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कार्यक्रमात संबोधित केलं. यावेळी काँग्रेस, समाजवादी पार्टी, डीएमके, टीएमसी यांसह इतर 14 पक्षांनी संसदेत झालेल्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचं समोर आलं आहे. आता शिवसेनेनेही या कार्यक्रमात सहभागी नसल्याचं सांगितलं आहे.

याबाबत बोलताना संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut ) यांनी मोदी सरकारला नाव न घेता अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. यावेळी ते म्हणाले, ‘देशात रोज संविधान पायदळी तुडवलं जातं. देशात संविधानाचं राज्य राहिलेलं नाही. हुकूमशाही पद्धतीने काम सुरु आहे. हे आपल्याला माहित आहे. मग संविधान पाळण्याचं नाटक कशासाठी?’ असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

ते पुढे म्हणाले, ‘मी राष्ट्रावादाविषयी म्हणत नाही. विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला आहे. राज्यघटनेतील अनेक कलमं, राज्याची अधिकार,संघराज्य व्यवस्था तोडली जात आहे. महाराष्ट्रातसुद्धा संविधानाच्या बाबतीतही राजभावनात काय सुरु आहे हे आपल्याला माहित आहे. मग हे नाटक कशाला?’ असा घणाघात त्यांनी केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत आयोजित कार्यक्रमात सर्व देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मोदींसह राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांनी देखील या कार्यक्रमाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संविधानप्रती आदर व्यक्त करतानाच संविधानाबद्दलचं महत्त्व बोलून दाखवलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पालकांनो लक्ष द्या! मुलांना शाळेत पाठवण्याआधी घ्या ‘ही’ काळजी

नशीब असावं तर असं! एकाच व्यक्तीला तब्बल दोन वेळा लाॅटरी, मिळाले ‘इतके’ कोटी

भावाचीच हवा! ‘गुटखा मॅन’चा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

लालपरी पुन्हा धावली! तब्बल ‘इतके’ कर्मचारी कामावर परतले

‘टोमॅटो पेट्रोलपेक्षाही महागलं’; वाढत्या महागाईवरुन शिवसेनेचे मोदी सरकारवर ताशेरे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More