बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गोकुळची निवडणुक जिंकताच सतेज पाटलांनी शेतकऱ्यांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

कोल्हापूर | मंगळवारी गोकुळ दूधसंघाच्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. या दूधसंघाच्या निकालात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. विजय जाहीर होताच काँग्रेस नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

सतेज पाटील यांनी विजयानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी शेतकऱ्यांना थेट 2 रूपये दरवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. दूध उत्पादकांच्या मालकीचा हा दूध संघ आता झाला आहे. दूध उत्पादकांनी चांगलं यश मिळवून दिलं आहे. मनापासून डोकं ठेवून दूध उत्पादकांचे आभार मानतो. हा दूध संघ मल्टिस्टेटच्या माध्यमातून कोणाच्या घशात जाऊ नये, ही आमची भावना आहे. निवडणूक आता संपली आहे. आम्ही निवडून आलोय. आता आमचा नवा अजेंडा असणार आहे, असं देखील सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

शेतकऱ्यांना आम्ही 2 रुपये दर वाढवून देणार आहोत. प्रस्थापित व्यवस्थेतील उणिवा दूर करायच्या आहेत, आम्ही मोठी धडक दिली. जिल्ह्यातून आमचं कौतुक होत आहे. चार जागा गेल्या याचं पॅनल प्रमुख म्हणून दुःख आहेच, पण ही लोकशाही आहे. मतदार हा आपला बाप आहे. निवडणुकीत शब्द अपशब्द वापरले गेले होते, ते व्हायला नको होतं, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत 21 पैकी सतेज पाटील यांच्या आघाडीला म्हणजेच राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीला 17 जागांवर विजय मिळवता आला आहे. मागील 30 वर्ष आमदार महादेवराव महाडिक यांची गोकुळ दूधसंघावर पकड होती.

थोडक्यात बातम्या-

लातुरात अनोखा विवाहसोहळा, ‘या’ कारणामुळं एकच चर्चा सुरु!

“कोरोनाने आपल्या पालकांना गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण द्या”

…म्हणून परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले- अनिल देशमुख

कोल्हापुरात पावसाचा कहर, आश्चर्यकारक घटना कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ

पुण्यात नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त! वाचा आजची आकडेवारी..

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More