बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाकडून तब्बल ‘इतक्या’ कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

मुंबई | माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांची पोलखोल करणार, असा इशारा दिला होता. त्यानंतर आज त्यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.

हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांनी कोट्यावधी रूपयांचे घोटाळे केले आहेत. हसन मुश्रीफ आणि कुटुंबीयांनी सरसेनानी संताजी धनाजी साखर कारखान्यामध्ये 100 कोटीहून अधिक भ्रष्टाचाराचा पैसा पार्क केला, मी हे जबाबदारीने सांगत आहे, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. याबाबत मी अधिकृतपणे ईडीकडे तक्रार करणार असल्याचं देखील किरीट सोमय्या यांनी सांगितलंय.

बोगस कंपन्याद्वारे मोठ्या प्रमाणावर मनी लाँडरिंग करणं, बेनामी संपत्ती विकत घेणं, असे गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत. माझ्याकडे याचे 2700 पानी पुरावे आहेत आणि ते सर्व पुरावे मी इनकम टॅक्स विभागाला दिले आहेत, असंही सोमय्या यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोप करताना दिसत आहेत. सोमय्या यांचे आरोप हसन मुश्रीफ यांनी फेटाळून देखील लावले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“पाशवी बलात्काराच्या घटनेनंतरही पाठ थोपटून घेणं हे स्वाभाविक”

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर

सिद्धार्थच्या आत्म्याशी संवाद साधल्याचा ‘या’ व्यक्तीनं केला दावा, संवादात सिद्धार्थ म्हणतो…

माझं गाणं प्रदर्शित होतं, तेव्हा लोक मला एका वेगळ्या चष्म्यातून पाहतात- अमृता फडणवीस

‘आज मला भारताची लेक असल्याची लाज वाटतेय’; मुनमुन संतापली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More