बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझं काही खरं नाही,…तर मी लगेच दुसऱ्या पक्षात उडी मारतो”

अहमदनगर | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार सुजय विखे यांची आज आढावा बेठक पार पडली. यावेळी त्यांना शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याबाबत विचारण्यात आलं. यावेळी विखेंनी माझंही काही खरं नाही, मला कोणत्याही पक्षाने डावललं की मी लगेच दुसऱ्या पक्षात उडी मारतो, असं विखे म्हणाले.

जगायचं आहे तो स्वत:ची काळजी घेईल. ज्याला मरायचं आहे त्याला फिरू द्या. कोरोनाचा सामना आपल्याला मोठ्या धैर्याने कारावा लागेल. गाव सुरू ठेवायचं की बंद यासाठी गावकऱ्यांनी हिमतीने निर्णय घेण्याची गरज आहे, असंही सुजय विखेंनी म्हटलं आहे.

दुर्देवाने आमच्या पक्षाचं सरकार राज्यात नाही.  मात्र तुम्हाला चांगला निधी आणणारा आमदार मिळाला आहे. सध्या राज्यात त्यांची सत्ता आहे. येथील समस्या मी रोहित पवारांच्या कानावर घालीन, असं सुजय विखे म्हणालेत.

दरम्यान, सर्व गावं उघडू द्या जातीने मी माझे किट वाटणार आहे. कारण लोकांना समजू द्या देणारा नाही तर उद्या दुसराच श्रेय घेऊन जाईल, असं सुजय विखे म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

पियूष गोयल यांचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले….

“ठाकरे सरकारला फडणवीसांच्या सल्ल्याची गरज नाही, त्यासाठी त्यांनी एखादी कंपनी उघडावी”

महत्वाच्या बातम्या-

“अर्थशास्त्र आम्हालाही समजतं, फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीची उद्या चिरफाड करू”

“आपलेच आपले सोडून जाऊ नये यासाठी किती ओरडावं लागतं ना…”

राज्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले?; पाहा तुमच्या भागात किती?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More