पुणे | पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ द इयर’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सिंगापूरमधील आघाडीचं वृत्तपत्र ‘द स्ट्रेट्स टाइम्स’ यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो. आणि या पुरस्काराेच मानकरी अदर पुनावाला ठरले आहेत.
या पुरस्कारासाठी आशियातील 6 व्यक्तींची निवड करण्यात येते. या 6 व्यक्तींमध्ये यंदा अदर पुनावाला यांच्या नावाचा समावेश आहे. कोरोनाच्या परिस्थितीत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.
सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड विद्यापीठ तसंच ब्रिटिश-स्वीडिश फार्मा कंपनीच्या मदतीने कोरोनावर ‘कोविशिल्ड’ लस तयार केली आहे. सध्या या लसीची भारतात तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरुये.
महत्वाच्या बातम्या-
‘राज ठाकरेंना निवडणुकीत हवं तसं यश मिळालं नाही, पण…’; शरद पवार
मुंबई महानगरपालिकेवर देखील भाजपचाच भगवा फडकणार- राम कदम
“भाजपने पराभवातून धडा घ्यायला हवा, देशात आता ईडी आणि सीबीआयचं राजकारण चालणार नाही”
‘कंगणा राणावत म्हणजे हिमाचलाचं सडलेलं सफरचंद’; या खासदाराची कंगणावर टीक
मेरे सैय्या सुपरस्टार; लग्नमंडपात नवरीनं केलेल्या डान्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ