बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अयोध्या वादावर शाहरूख खाननं सुचवला होता हा तोडगा; शरद बोबडेंच्या निरोप समारंभात मोठा खुलासा

नवी दिल्ली | गेली दोन दशकं अयोध्याच्या प्रकरणावरून राजकारण तापलं होतं. सर्वोच्च न्यायालयाचे 47वे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे हे सरन्यायाधीश पदावरुन शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या काळातच अयोध्या प्रश्नांचा निकाल लागला होता. बोबडे यांना शुक्रवारी एका विशेष कार्यक्रमामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनकडून निरोप देण्यात आला. या कार्यक्रमात सार्वजनिक पद्धतीने एक मोठा खुलासा करण्यात आला आहे.

जेव्हा अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात होती. तेव्हा त्यांनी अभिनेता शाहरुख खान या सामितीचा भाग होऊ शकतो का?, असं न्यायमूर्ती बोबडे यांनी वरिष्ठ अधिवक्ता विक्रम सिंह यांना विचारलं होतं. विक्रम सिंह शाहरूख खानच्या परिवाराला चांगलंच ओळखत होते, त्यामुळे त्यांनी हा प्रश्न विचारला होता. शाहरुख सोबत यासंदर्भात चर्चा केली होती. तो यासाठी तयारही झाला होता असं सिंह यांनी सांगितलं, असं न्यायमूर्ती बोबडे यांचं गुपीत विक्रम सिंह यांनी भर कार्यक्रमात सांगितलं.

मंदिराची पायाभरणी मुस्लिमांकडून करण्यात यावी आणि मशिदीची पायाभरणी हिंदूंनी ठेवावी असंही शाहरुखने सांगितलं होतं. मात्र शाहरुखचे मध्यस्थी करण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यामुळे यासंदर्भात पुढे विचार करण्यात आला नाही. मात्र सांप्रदायिक तणाव मध्यस्थीच्या माध्यमातून सोडवण्यासंदर्भात त्याने व्यक्त केलेली इच्छा ही कौतुकास्पद होती, असं सिंह म्हणाले.

दरम्यान, मी प्रसन्न मानाने, सद्भभावनेने आणि खूप चांगल्या आठवणी सोबत घेऊन सर्वोच्च न्यायालयाचा निरोप घेत आहे. तसेच मी येथे माझी सर्वोत्तम कामगिरी करु शकलो याचा मला आनंद आहे, असं शरद बोबडे यांनी बार असोसिएशनच्या कार्यक्रमात सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; घरासह मालमत्तांवर सीबीआयची छापेमारी

महामारीच्या काळात ‘या’ पेयांनी वाढवा रोग प्रतिकारशक्ती; जाणून घ्या अधिक माहिती

राहुल गांधी म्हणजे राजकीय विनोदरत्न’; चंद्रकांत पाटील यांची घणाघाती टीका

‘ऑक्‍सिजन’साठी कोल्हापूर-सातारा आमने-सामने; दोन जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद

सुश्मिता सेनने उपलब्ध करुन दिले ऑक्सिजन सिलेंडर्स; चाहत्यांनाही केलं मदतीचं आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More