मिरा आणि शाहीद दुसऱ्यांदा बनले आई-बाबा, मिशाला मिळाला छोटा भाऊ

मुंबई | बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर आणि पत्नी मिरा राजपूत यांच्या घरात नवीन पाहुण्याचं आगमन झालं आहे. बुधवारी मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात संध्याकाळी 4 वाजता मिराने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. 

मंगळवारी रात्री मिरा आणि शाहीद डिनर डेटला गेले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी मिराला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर संध्याकाळी मिराने एका मुलाला जन्म दिल्याची गोड बातमी मिळाली. 

दरम्यान, शाहीद मिरा दुसऱ्यांदा आई-बाबा झाले असून त्यांची मोठी मुलगी मिशा ही दोन वर्षांची आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-…अखेर राम कदम नमले; ट्विटरवरून मागितली माफी

-मलाईकाचं नवीन आयटम साँग ‘हॅलो हॅलो’ नाही पाहिलं तर काय पाहिलं?

-…अखेर महिला आयोगाला जाग; राम कदमांना पाठवली नोटीस

-…तर संतापाचा भडका उडेल; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला इशारा

-राम कदमांविरोधात गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलन करू; काँग्रेस-राष्ट्रवादीचा इशारा