बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शाहिस्ते खानाची नुसती बोटंच छाटली होती तुझा पंजाच छाटला जाईल”

अमरावती | काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांंचं वादग्रस्त वक्तव्य चांगलंच अंगलट आल्याचं चित्र पहायला मिळत आहे. मोदींवर केलेल्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंवरविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ पहायला मिळत आहे.

‘सोनिया गांधी यांना खुष करण्यासाठी मोदी वर किती भुंकायचे याची शर्यत काँग्रेसमध्ये लागली आहे. नाना ने तर हद्दच केली. मी मालकीनीचा सगळ्यात प्रमाणिक कुत्रा आहे म्हणून दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचाही धमकी दिली,’ असं वक्तव्य भाजपचे माजी कृषि मंत्री अनिल बोंडे यांनी केलं आहे.

पुढे त्यांनी म्हटलं की,  नानांनी लक्षात ठेवाव शाहिस्ते खानाची नुसती बोटंच छाटली होती तुझा पंजाच छाटला जाईल. उगीचच गमज्या मारू नको. अमरावतीवरून पोरं निघाले आहेत पंजा सांभाळून ठेव.

दरम्यान, मी मोदीला शिव्याही देऊ शकतो आणि मारुही शकतो, असं वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. या वादग्रस्त वक्तव्यावरुन भाजप चांगलंच आक्रमक झालं आहे. नाना पटोलेंना अटक करण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘मला खूप भरुन येतंय भावांनो…’; किरण मानेंची भावूक पोस्ट व्हायरल

“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा आणि पुण्यातल्या ‘येरवड्या’त दाखल व्हावं”

“नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा”

‘मी मोदीला शिव्या देऊ शकतो आणि मारुही शकतो’; नाना पटोलेंच्या वक्तव्यानं खळबळ

पुढील 24 तास महत्त्वाचे, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More