बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझ्याशी लग्न का करत नाहीस?’; शहनाज सिद्धार्थचा ‘तो’ रोमँटिक व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

मुंबई | बिग बॉस 13 या रियालिटी शो मधील विजेता सिद्धार्थ शुक्लाचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सिद्धार्थ शुक्लाने वयाच्या 40व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक निधनाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची बिग बॉस 13 शोमध्ये चांगली मैत्री झाली. त्यांनी या शोमध्ये एकमेकांना खुप सपोर्ट केला. सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज गिलचा ‘मुझसे शादी करोगी’या शोमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडीओ मध्ये शहनाज सिद्धार्थला डोळे बंद करून देखील ओळखत असल्याचं दिसत आहे. सिद्धार्थ शुक्ला शहनाजवर कौतुकाचा वर्षाव करत आहे. शहनाजने देखील अनेकवेळा सिद्धार्थबाबत तिच्या मनातील भावना शेअर केल्या आहेत. शहनाजला सपोर्ट करण्यासाठी सिद्धार्थ ‘मुझसे शादी करोगी ’या’शोमध्ये आला होता. शहनाजचे डोळे बांधलेले या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मनीष पॉल तिला स्टेजवर फसवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र शेहनाज फसत नाही, ती सिद्धार्थला हात लावल्यानंतर बोलते की, हा मला सिद्धार्थ सारखा वाटतोय. प्रत्येक मुलाची पर्सनालिटी पाहिल्यानंतर शहनाज सिद्धार्थला बरोबर ओळखते. शहनाज सिद्धार्थ शुक्लाला पाहते तेव्हा ती त्याला जोरदार मिठी मारते.

दरम्यान, सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. व्हिडीओमध्ये सिद्धार्थने शहनाजचे कौतुक केल्यामुळे, तु एवढी माझी स्तुती करत आहेस तर, माझ्याशी लग्न का करत नाहीस, असं शहनाजने म्हटलं आहे. दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

थोडक्यात बातम्या- 

मुकेश अंबानींचा मोठा प्लॅन तयार, पहिल्यांदाच केला शेअर

‘देशात 8.5 टक्क्यांनी बेरोजगारी वाढली आहे’; राष्ट्रवादीची केंद्र सरकारवर टीका

कोरोना आणि गणेशोत्सवाबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाले

बेळगावच्या जनतेला संजय राऊतांनी केलं ‘हे’ आवाहन, पाहा व्हिडीओ

ईडीची ‘त्या’ छापेमारीवरून अजित पवार माध्यमांवर भडकले; म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More