Top News देश मुंबई

पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार?, ‘या’ माणसाचा सल्ला मोदी ऐकणार का?

Photo Courtesy- Twitter/@DasShaktikanta

मुंबई | पेट्रोल आणि डिझेलच्या चढत्या दरामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आलेला असताना रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केंद्र सरकारला इंधनावरील कर कमी करण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या एमपीसी बैठकीत गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी राज्य आणि केंद्र सरकारला इंधनावरील कर कमी करून सामान्य जनतेला दिलासा देण्याचा सल्ला दिला आहे.

अर्थव्यवस्थेवर बनत चाललेल्या आर्थिक बोजाला हटवण्यासाठी हळू हळू सरकारने इंधनावरील कर कमी करण्यास सुरू केले पाहिजे असं दास यांनी बोलताना सांगितलं आहे. देशाचा ठोक महागाई दर हा गेल्या डिसेंबरमध्ये खाद्य आणि इंधन वगळल्यानंतरही 5.5 टक्क्यांवर राहिला आहे.

केंद्र आणि राज्यांनी लावलेल्या अप्रत्यक्ष कराचा बोजा कमी केल्यास महागाई आटोक्यात येईल आणि महाग होत चाललेल्या वाहतूक सेवा आणि आरोग्य सेवांच्या किमतीही नियंत्रणात येतील असं या बैठकीत सांगण्यात आलं आहे. आजकाल रोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलताना दिसून येतात. गेल्या काही दिवसांपासून हे दर सातत्याने चढत असल्याचं बघायला मिळालं.

दिल्ली मध्ये पेट्रोल सध्या 90.35 रुपये प्रतिलिटर मिळत असून मुंबई मध्ये त्याची किंमत 97.34 रुपये प्रति लिटर एवढी आहे. पेट्रोल दर वाढीने आत्तापर्यंत चा उच्चांक गाठला आहे त्यामुळे, सर्व सामान्य व्यक्तीचं दैनंदिन बजेट कोलमडलं आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आता कधी कमी होणार? याची सर्वसामान्य जनता आतुरतेने वाट बघत आहे.

थोडक्यात बातम्या-

मृतदेह घेऊन रुग्णालयात पोहोचली महिला, खरा प्रकार पाहून पोलीसही चक्रावले

वारकरी बाहेर पडले तर सरकारच्या अंगलट येईल, ‘या’ महाराजांनी दिला इशारा

मी वाईट माणूस नाहीये रे…. अभिनेत्रीच्या आरोपावर दिग्दर्शकाचं भावनिक स्पष्टीकरण

संजय राठोड शक्तिप्रदर्शन करणार?, इतक्या हजार लोकांची गर्दी होण्याची शक्यता

पूजा चव्हाण प्रकरणात नवा मेसेज व्हायरल, संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या