बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पाहुण्यांनी घरात किती दिवस मुक्काम करावा याला काही मर्यादा असतात”

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणी व निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे काही दिवसांपूर्वी छापे पडले. त्यानंतर राजकीय वर्तुळात मात्र एकच खळबळ माजल्याचं चित्र पाहायला मिळालं. तसेच या सर्व घटनेवरून केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजप गैरवापर करत असल्याचा आरोपही केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मुद्द्यावरून तपास यंत्रणांवर टीकास्त्र डागलं आहे.

आयकर विभागाचे छापे पडल्यानंतर अजित पवारांनी पाहुणे अजून घरातच आहेत ते गेल्यानंतर भूमिका मांडतो, असं म्हटलं होतं. पण पाहुणे घरात किती दिवस राहणार याला काही मर्यादा असतात, जिथे छापे पडले तेथील चौकशी एका दिवसातही होऊ शकते, असं असताना 6 दिवस पाहुणचार घेणं कितपत योग्य? असा प्रश्नही शरद पवारांनी उपस्थित करत तपास यंत्रणांना टोला लगावला आहे.

लखीमपुर घटनेवर मत व्यक्त करत असताना त्या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केल्याने सूड भावनेतून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोपही शरद पवारांनी केला आहे. दरम्यान, यामुळे भाजपवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली आहे.

दिल्लीचे आदेश येईपर्यंत घरातून बाहेर पडायचं नाही, असं काही अधिकाऱ्यांकडून समजतंय असे शरद पवारांनी म्हणत केंद्र सरकार ईडी, सीबीआय व आयकर विभागाचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे. त्याचबरोबर एमसीबी वर नवाब मलिक यांनी आरोप केल्यानंतर त्यावर स्पष्टीकरण द्यायला भाजप नेते पुढे येतात. यावरूनच त्यांच्यात संगणमत असल्याचं दिसून येतंय, असा घणाघाती हल्ला शरद पवार यांनी केला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्र पोलिसांचा विदेशात डंका! एपीआय सुभाष पुजारींनी पटकावलं कांस्य पदक

कोरबो लोरबो जितबो रे! रोमांचक विजयासह कोलकाताची फायनलमध्ये एन्ट्री

“भाजपमध्ये गेल्यापासून मला शांतपणे झोप लागते, कसलीही चौकशी नाही”

“जम्मू काश्मीरमध्ये नागरिकांना सध्या असुरक्षित वाटतंय”

‘मला वाटत नाही गांधीजी देशाचे राष्ट्रपिता आहेत’; रणजित सावरकरांचं मोठं वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More