…मग अमित शहांनी देवेंद्र फडणवीसांकडून सल्ला घ्यायला पाहिजे होता!

…मग अमित शहांनी देवेंद्र फडणवीसांकडून सल्ला घ्यायला पाहिजे होता!

मुंबंई | 50 टक्क्यांवर आरक्षण देता येत नाही असं भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं होतं. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलायला पाहिजे होतं, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं त्याप्रमाणं धनगर आणि मुस्लिम समाजाला अारक्षण देण्यात यावं, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते अलिबागमध्ये पत्रकार परिषदेत बाेलत होते.

लाेकसभा निवडणुकीत स्थानिक पातळीवर आघाड्या व्हाव्यात अाणि निकाल लागल्यावर देश पातळीवर आघाडी व्हावी, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, निवडणुकीच्या काळातच राम मंदिराचा मुद्दा पुढं आणला जातो, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-मराठा आरक्षणावर लगेचच सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार

-अभिनेत्री माधुरी दीक्षितला पुण्यातून मिळणार लोकसभेची उमेदवारी?

-‘कुठेही जा तू स्वप्नाली, मी तुला राहू देणारच नाही’

-पंढरपुरात भिंती रंगल्या; जागोजागी लिहिलंय चौकीदार ही चोर है!

-मुंबईतील 1RK फ्लॅटपेक्षा मोठा आहे प्रियांकाने लग्नात घातलेला गाऊन!

Google+ Linkedin