मुख्यमंत्री माझं ऐकतात, हे खरं नाही- शरद पवार

यवतमाळ | मुख्यमंत्री माझं ऐकतात हे खरं नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांशी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. 

यवतमाळच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी बोंडअळीग्रस्त कापसाची पाहणी केली. तेव्हा आमच्या अडचणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा कारण ते तुमचं ऐकतात, असं शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं. तेव्हा मुख्यमंत्री माझं ऐकतात हे खरं नाही, असं शरद पवार म्हणाले. 

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले शरद पवार आज यवतमाळमध्ये आहेत. फवारणीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ते भेटणार आहेत.