Loading...

विरोधकांचं राहू द्या… तुम्ही 5 वर्षात काय काम केलं ते सांगा- शरद पवार

यवतमाळ |  विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय खरा, पण समोर विरोधकच शिल्लक नसल्याने काही मजा येत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांची खिल्ली उडवली होती. त्यांच्या याच टीकेला आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. विरोधकांचं राहू द्या… तुम्ही 5 वर्षात काय काम केलं हे सांगा, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

शरद पवार महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज यवतमाळमध्ये सभा घेतली. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्र्यांसहित केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तसंच मुख्यमंत्री फडणवीसांचा कारभार गुजरात धार्जिणा आहे, असा आरोप केला.

Loading...

दिल्लीतून आलेले निर्देश मुख्यमंत्री फडणवीस कोणताही विचार न करता जशाच्या तश्या महाराष्ट्रात लागू करतात. त्यांनी 5 वर्षे सत्तेच्या काळात किती उद्योग महाराष्ट्रात आणले? किती रोजगारांची निर्मिती केली? हे एकदा जाहीर करावं, असं आव्हान पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.

महाराष्ट्रात कामगार बेरोजगार झालेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, महिलांवरच्या अन्याय अत्याचारात वाढ होतीये. म्हणून जनतेने महाआघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन शरद पवार यांनी उपस्थित लोकांना केलं.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

Loading...