इंदिरा गांधींनी निवडलेले ते सर्व तरुण पुढे मुख्यमंत्री झाले- शरद पवार

बारामती | माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना माणसांची किती पारख होती आणि किती दूरदृष्टी होती, याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. बारामतीच्या पासपोर्ट कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

इंदिरा गांधींनी माझा एका आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळात समावेश केला होता. यात माझ्यासह नारायणदत्त तिवारी, अर्जुनसिंग, सी. के. जाफरशरीफ आणि रेड्डी हे होते. त्या वेळी इजिप्तला आमचे शिष्टमंडळ जाणार होते.

दरम्यान, काही काळानंतर या शिष्टमंडळात इंदिरा गांधी यांनी ज्यांचा ज्यांचा समावेश केला, ते सर्वच जण मुख्यमंत्री झाले! गांधी यांची निवड किती अचूक होती हे काळानेच दाखवून दिले, असं शरद पवारांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-बाबा बोलवतात तेच लोक कैलास यात्रेला येतात; राहुल गांधींचा मोदींना टोला

-वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राम कदमांवर भाजप कारवाई करणार?

-काँग्रेसच्या रक्तात ब्राह्मण समाजाचा डीएनए- रणदिपसिंह सुरजेवाला

-नागपुरात भाजपला धक्का; व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षाचा राष्ट्रवादीत प्रवेश

-माफी नव्हे राम कदमांकडून खेद व्यक्त; म्हणे 54 सेकंदाची क्लिप दाखवून संभ्रम निर्माण केला!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या