‘…त्या धारेची किंमत मलाही मोजावी लागली’; शरद पवारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जीवनावर आधारीत छायाचित्रांच्या प्रदर्शनास भेट दिली. यानंतर शरद पवारांनी बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
आम्ही दोघांनी भाषणातून एकमेकांवर खूप टीका केल्याचं शरद पवार म्हणाले. त्याकाळात आम्ही कुठेही असलो तरी संध्याकाळी एकत्र असायचो. मीनाताई आमच्या आवडीचं जेवण बनवायच्या. तासनतास आमच्या गप्पा चालायच्या आणि काही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा व्हायची, असंही शरद पवार म्हणाले.
बाळासाहेब स्वत:ही एक कलाकार आणि व्यंगचित्रकार होते. त्यांच्या व्यंगचित्रांना धार असायची. त्या धारेचा विरोधकांवर जो काही परिणाम व्हायचा त्याची किंमत मलासुद्धा मोजावी लागली, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात एक नवनेतृत्व तयार केलं. ज्यांना आयुष्यात कधी विधानसभा आणि संसद माहिती नव्हती अशा लोकांना बाळासाहेबांनी मोठमोठ्या पदावर बसवलं असल्याचंही शरद पवार म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
राष्ट्रवादीनंतर काँग्रेसची शिवसेनेवरही नाराजी, नाना पटोले म्हणतात…
तृप्ती देसाईंची रूपाली चाकणकरांवर खोचक शब्दात टीका, म्हणाल्या…
मोठी बातमी! राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द, ‘हे’ मोठं कारण आलं समोर
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली, संजय राऊतांच्या वक्तव्याने खळबळ
केतकी चितळे प्रकरणाला नवं वळण, ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर
Comments are closed.