“…म्हणून भाजप ठाकरे सरकारवर दबाव आणतंय”, पवारांनी सांगितलं कारण
जळगाव | राज्यात सध्या चालू असलेल्या राजकीय गोंधळावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला देखील पवारांनी उत्तर दिलं आहे.
राज्यात असलेलं सामाजिक ऐक्य संकटात येऊ नये हीच मला चिंता आहे, असं मत पवारांनी व्यक्त केलं आहे. राज्य ताब्यात घेण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. भाजपचा राज्यात अपेक्षाभंग झाला आहे म्हणूनच महाविकास आघाडीवर दबाव आणला जात आहे, असंही शरद पवार म्हणाले आहेत.
एखादी व्यक्ती सोडली तर राजकारण असं करा, हे सांगणारा पक्ष मला अद्यपी दिसला नाही, असा टोला पवारांनी मनसेला लगावला आहे. राज ठाकरे आता हिंदूत्वाच्या मार्गानं जात असल्याचं मला दिसत आहे. केंद्रातील सत्तेत असलेल्यांनी अशा पक्षांना समर्थन द्यावं याची काळजी वाटते, असं पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, शरद पवार हे राज्यात जातीवादी राजकारणाला खतपाणी घालत असल्याची टीका मनसे आणि फडणवीस यांनी केली होती. तेव्हापासून राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
थोडक्यात बातम्या –
… अन् ‘या’ कारणामुळे रणबीर-आलियाने लग्नात सात नाही तर चारच फेरे घेतले
“गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा, 2-4 भाजप नेत्यांना तुरूंगात पाठवा”
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा
संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना थेट इशारा, म्हणाले…
“असे हे किरीट सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार?”
Comments are closed.