मुंबई | नाथाभाऊ काय चीज आहे तुम्हाला दाखवून देऊ, असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. तसेच एकदा शब्द दिला म्हणजे त्यावरून नाथाभाऊ मागे हटत नाहीत, असंही शरद पवार म्हणाले.
एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्ष प्रवेश झाल्यानंतर शरद पवार बोलत होते.
खान्देश हा संपूर्ण परिसर गांधी-नेहरुंच्या विचाराचा होता. मध्यंतरी त्याला उतरती कळा लागली. या काळात नवी पिढी तयार झाली. ही पिढी घडवण्याचं काम नाथाभाऊंनी केलं, असं पवारांनी सांगितलं आहे.
नाथाभाऊ जेव्हा शब्द देतात तेव्हा तो पूर्ण करतात. त्यावरून मागे हटत नाहीत. ही त्यांची खासियत आहे, असं पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
भाजपसाठी जितक्या निष्ठेने काम केलं, तितकंच राष्ट्रवादीसाठी करेन- एकनाथ खडसे
IPL2020- आज मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज; चेन्नईसाठी ‘करो या मरो’ची लढाई
‘काना मागून आला आणि तिखट झाला’; नाव न घेता जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला
शरद पवारांच्या उपस्थित एकनाथ खडसेंचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश!
Comments are closed.