मुंबई | एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीचा जो प्रयोग झाला तो बाळासाहेबांना आवडला असता, असं शरद पवार म्हणालेत.
जेव्हा राजकीय मतभेद होतात. त्या वेळेला बाळासाहेबांनी काय केलं असतं हे डोक्यात येतं आणि निर्माण झालेल्या वादावर उत्तर मिळतं असं शरद पवारांनी सांगितलं.
शरद पवारांनी काल त्यांच्या मुख्यमंत्री काळातील एक आठवण सांगितली. तेव्हा त्यांच्या मतदारसंघातील एक महिला मुख्यमंत्री असताना तिचे काम घेऊन मुंबईत आली. मी तिला नावाने हाक मारली. मी नावाने हाक मारल्यानंतर ती तिचं काम विसरून गेली अन् गावात सगळ्यांना सांगितले. मला साहेबांनी नावाने हाक मारली, असंही पवारांनी सांगितलं.
त्यावेळी माझ्या मतदार संघातील पन्नास टक्के लोकांना नावाने ओळखायचो. आता तसं होतं नाही. त्यांच्या आजोबांचं नाव सांगितलं की कळतं हा कुणाच्या घरातलं आहे अशी एक आठवण त्यांनी सांगितली.
थोडक्यात बातम्या-
“आम्ही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच, शेंबड्या पोराला समजवतात तसं पडळकरांना समजवा”
Monsoon Update: पुढील पाच दिवसात राज्यातील ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज
“उद्धव ठाकरेंच्या सभेची गर्दी विरोधकांना मोजत बसावी लागेल”
“कोरोनाच्या काळातही भारत थांबला नाही, देशाने आपल्या सुधारणांचा वेग वाढवला”
“…यांचं वागणं बघून हनुमानानेही कपाळावर हात मारून घेतला असेल”
Comments are closed.