बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लोकशाहीविरोधी वागणाऱ्या कुठल्याही शक्तीला जनतेनं सोडलं नाही, त्यांना धडा शिकवला”

मुंबई | देशातील लोकांच्या मनात लोकशाहीचा विचार रुजला आहे. त्यामुळे लोकशाहीविरोधात वागणाऱ्या कुठल्याही शक्तीला देशातील जनतेनं सोडलेलं नाही, त्यांना धडा शिकवला आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

देशातील जनेच्या मनात लोकशाहीबाबत श्रद्धा आहे. त्यामुळे आणीबाणीनंतर लोकांना संधी मिळाली तर त्यांनी लोकशाहीविरोधात वागणारी कोणतीही शक्ती असो त्यांना धडा शिकवल्याचं शरद पवार म्हणाले. यावेळी पवारांनी इंदिरा गांधींचं उदाहरण दिलं.

इंदिराजींसारख्या बड्या नेत्यालाही लोकांनी सत्तेपासून दूर ठेवलं. कारण लोकशाहीविरोधात छेडछाडी करण्याची त्यांची तयारी नव्हती, असं पवारांनी सांगितलं.

दरम्यान, जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून समाजवादी विचारांची शक्ती समोर आली. त्यानंतर या विचारांवर चालणारे लाखो लोक पुढील अनेक वर्षात तयार झाले. देशाच्या हितासाठी त्यांनी काम केलं, असं पवार यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘KGF Chapter 2 या चित्रपटाच्या प्रदर्शनादिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करा’, चाहत्याचं पतंप्रधानांना पत्र

स्वतःचं अपयश लपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी ‘ते’ वक्तव्य केलं- अजित पवार

नवरा दलित आहे म्हणून आई-वडिलांनी गरोदर मुलीसोबतच केलं हे धक्कादायक कृत्य

वसुलीसेना?; मुख्यमंत्र्यांचा फोटो छापून फेरीवाल्यांकडून फाडल्या जातायेत पावत्या

अमित शहांचे पूत्र कुठल्या आधारावर BCCI चे सचिव झाले?; मोदींचा सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More