…त्या व्हिडीओवर शरद तांदळेंनी मौन सोडलं, म्हणाले, “सत्य असत्याशी मन केले ग्वाही…”
मुंबई | प्रसिद्ध लेखक आणि उद्योजक-व्याख्याते शरद तांदळे यांची दोन वर्षापुर्वींची व्हिडीओमधील क्लिप व्हायरल होत आहे. त्यामध्ये वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांची ही क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. यामुळे तांदळेंवर जोरदार टीका होऊ लागली आहे. मात्र या व्हिडीओवर स्वत: शरद तांदळेंनी मौन सोडत त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.
काल पासून एका व्हिडीओचा तुकडा सोशल मीडियावर पसरवत काही विशिष्ट लोकांनी मी संप्रदायाची बदनामी केल्याचा खोटा आरोप केला आहे. या ठराविक लोकांनी वारकरी संप्रदायाचा राजकीय वापर करू नये. ही हातपाय तोडण्याची भाषा काही सहिष्णु आणि विनयशील वारकऱ्यांची नसून यात राजकीय लोक असल्याचं शरद तांदळेंनी म्हटलं आहे.
हा व्हिडीओ दोन वर्षापूर्वीचा आहे त्यामागचा संदर्भ माहित नसताना असे आरोप माझ्यावर केले जात आहेत. मुळात मी तरूण असताना व्यवसाय करण्याच्यादृष्टीने वेगवेगळे विचार करत होतो. त्यावेळी सामान्य तरूणांना वाटतात अशे विचार माझ्याही मनात यायचे, तेच मी प्रामाणिकपणे मांडले. यात हेतु शुद्ध होता माझेही कुटुंब वारकरी संप्रदायावर श्रद्धा असणारं आहे, असं तांदळे म्हणाले.
दरम्यान, खेड्यात पाच पंचवीस लोकं एकदा बाबा म्हणून पाया पडले की अख्ख गाव पाया पडतं. त्याला खूप हुशार असण्याची गरज नाही. खूपच काही झालं तर शेवटी म्हणायचं ‘हरे राम’ किंवा हरे कृष्णा की संपलं. त्यापुढे जाऊन बोला पुंडली का वरदे म्हणायचं, सगळे लोक म्हणतात याला लईच कळतंय. शेवटी हरिपाठातील एखादा डायलॉग पाठ करायचा. हा धंदा लई सोपा आहे, असं शरद तांदळे त्या क्लिपमध्ये बोलत आहेत.
थोडक्यात बातम्या-
राज्यातील भाजपच्या या बड्या नेत्याला झाली कोरोनाची लागण
सुर्यकुमारला संधी का दिली नाही हे मला काही कळलं नाही – गौतम गंभीर
न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या मराठी अभिनेत्रीने पुन्हा शेअर केले आपले बोल्ड फोटो!
भाजपचे विद्यमान नगरसेवक संजय भोपी यांचं कोरोनामुळे निधन!
अमित ठाकरेंनी शिक्षक आंदोलकांना दिलेला ‘तो’ शब्द पाळला!
Comments are closed.