बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज कुंद्रा मला किस करत म्हणाला, माझे शिल्पाचे संंबंध ठीक नाहीत”

मुंबई |  अश्लील व्हिडिओ प्रकरणात अडकलेल्या राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 19 जुलै रोजी त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आली होती. राज कुंद्रा प्रकरणात अनेक अभिनेत्रींची नाव जोडली गेली. अशातच या प्रकरणामधील चर्चेतली अभिनेत्री शर्लिन चोप्राने धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

2019 ला राजने माझ्या बिझनेस मॅनेजरशी संपर्क साधला होता. 27 मार्चला यानिमित्ताने मीटींग झाल्यावर एका  टेक्स्ट मेसेज वरून झालेल्या वादामुळे तो माझ्या घरी आला असल्याचं शर्लिनने जबाबात म्हटलं आहे. राज मला सारखा किस करत होता त्यावेळी मी राजला सांगितलं की, मला विवाहित पुरुषासोबत संबंध ठेवायचे नाहीत. यावर राज म्हणाला की, शिल्पासोबत माझे संबंध काही ठीक नाहीत त्यामुळे राज नेहमी तणावात दिसत असल्याचं शर्लिन चोप्राने सांगितलं.

मला त्यावेळी भिती वाटू लागली होती म्हणून राजला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र आणि काही वेळानंतर त्याला धक्का देऊन बाथरूममध्ये गेले, असंही शर्लिनने जबाबत म्हटलं आहे. त्यामुळे आता राज आणखीन गोत्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिल्पा शेट्टीच्या पतीने लॉकडाऊन दरम्यान त्याच्या हॉटशॉट्स या अॅपला ग्राहकांनी केलेल्या सबस्क्राईबमधून 1.17 कोटी रुपये मिळवले. त्याची ही कमाई ऑगस्ट ते डिसेंबर 2020 पर्यंत आहे. ही कमाई अ‍ॅपल स्टोअरची असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

‘अजित पवारांनी भाषेबाबत बोलणं म्हणजे राज कुंद्राने…’; नितेश राणेंची जोरदार टीका

नारायण राणेंच्या मुलांसारखी मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत- भास्कर जाधव

चिपळूण दौऱ्यावेळी अधिकाऱ्यांना झापत, मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राणेंना अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

भाजप-मनसे एकत्र येणार का?; राज ठाकरे म्हणतात…

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात सीबीआयची मोठी कारवाई!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More