बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हा केतकर दररोज कांबळे-पवार यांच्या दिग्दर्शनाखाली काम करतो”

मुंबई | मराठी मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत नेहमी ब्राह्मण मुली दिसतात. इतर मुली का नाहीत? असा सवाल केसरीचा दिग्दर्शक सुजय डहाके याने एका मुलाखतीत केला होता. यावरुन मोठा वाद निर्माण झाला असून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार यावर व्यक्त होऊ लागले आहेत. यातच अभिनेता शशांक केतकरने फेसबुकवरुन सुजयला सुनावलं आहे.

माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, देवधर तुझा अभिनेता, जोशी तुझा संगीत दिग्दर्शक आणि तू कसले बिन बुडाचे आरोप करतोस रे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंट ला जागा आहे. कृपा करून हे असले स्टंट करू नकोस. त्या पेक्षा तुझ्या कामावर लक्ष दे जमल्यास, असं म्हणत केतकरने टीका केली आहे. साने आणि मंजुळे हे कॉम्बिनेशन पुरेस नाहीये का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला? असंही तो म्हणाला आहे.

कांबळे, छल्लारे आणि पवार यांच्या दिग्दर्शनाखाली हा केतकर रोज काम करतो आणि याचा मला अभिमान आहे. तू कोणत्या जाती धर्माचा आहेस याचा तसूभरही विचार डोक्यात न आणता तुझं कल्याणच होऊदे, तुझे चित्रपट चालुदे हीच इच्छा आहे, असा सणसणीत टोलाही केतकरने लगावला आहे.

केतकरने यासंबंधी अभिनेत्रींची यादी दिली असून या सगळ्या उत्तम अभिनेत्री आहेत, आणि त्यांना टॅलेंट मुळे कामं मिळाली आहेत. कोणतही चॅनल जात, धर्म बघून काम देत नाही तर टॅलेंट बघून काम देत, असं तो पोस्टमध्ये म्हणाला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मी ब्राह्मण नाही पण…; तेजश्री प्रधाननं सुजय डहाकेला सुनावलं

तुझं आयुष्य उद्धवस्त करु; विद्या चव्हाणांच्या सुनेला धमकी

महत्वाच्या बातम्या-

फ्लिपकार्टच्या सचिनविरोधात पत्नी आणि मेव्हणीचे अत्यंत धक्कादायक आरोप

शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधीचं कर्ज घेतल्याप्रकरणातील रत्नाकर गुट्टे तुरुंगाबाहेर

बुलडाण्याची चौदा वर्षीय सहरीश बनली पोलीस अधीक्षक!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More