नेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला!

नवी दिल्ली | ‘माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला’ असं म्हणत काँग्रेस नेते शशी थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

नेहरु यांच्यावर आधारित एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी नेहमी नेहरुवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या भाजपावर टीका केली आहे.

‘नेहरु यांनी येथील लोकशाही मजबूत केली आहे. अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेथील स्वातंत्र्यनायक हुकूमशहा बनले. पण नेहरुंनी तसं केलं नाही.’ असं ते म्हणाले.

दरम्यान, पुस्तक प्रकाशनाच्या नंतर झालेल्या भाषणात सोनीया गांधी यांनी मोदी यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

महत्त्वाच्या बातम्या-

-ऑनलाईन पेमेंट करणं आता आणखी महाग होणार?

-नरेंद्र मोदींची डोकेदुखी वाढली; गुजरात दंगल प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

-मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस?

-ही ‘समृद्धी’ कुणाची?; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद

-मराठा समाजाची प्रतिक्षा संपली? 2 दिवसात सादर होणार अहवाल???