देश राजकारण

जेव्हा कमळाचं राज्य येईल तेव्हाच…., राम मंदिर भूमीपूजनावर शत्रुघ्न सिन्हा यांचं ट्विट!

नवी दिल्ली | देशात टाळेबंदी असतानाही राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सोहळा अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडला. प्रत्येकाला या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असं वाटतं होते. पण प्रत्येकाने हा कार्यक्रम घरी बसून लाईव्ह पाहिला.

राम मंदिराच्या आयोजनानिमित्त बॉलिवूड अभिनेते आणि काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा सक्रिय दिसत होते. शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विट करून सर्व भारतीयांना राम मंदिर भूमिपूजनाच्या शुभेच्छा दिल्या.

शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटमध्ये असं लिहिलंय,”अभिनंदन..! जय श्रीराम..! आमचे मुंबईतील घर हे ‘रामायण’ च्या रुपात पाहिले जाते, त्यामुळे आमचे सर्व कुटुंब खऱ्या अर्थाने रामायणातील रहिवासी आहोत. एक सुंदर आणि महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या मोठ्या आणि महत्त्वाच्या दिवशी ही माहिती देत आहे. मी आशा करतो की, ही माहिती खरी असेल…!”

शत्रुघ्न सिन्हा यांनी पुढे ट्विटमध्ये असं लिहिलं,”हा योगायोगच म्हणावा लागेल. १८१८ मध्ये २ रुपयांचे नाणी होते. त्या नाण्याच्या एक बाजूला राम दरबारातील कुटुंबातील व्यक्तींचे फोटो आहे तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला कमळाच्या फुलाचा फोटो होता. असं म्हणतात की, अयोध्येत जेव्हा कमळाचे राज्य येणार तेव्हाच तेथे दीपोत्सव साजरी होणार आणि मग भगवान श्रीराम यांचे भव्य मंदिर उभे राहणार.”

 

 

शत्रुघ्न सिन्हा सामाजिक माध्यमांवर नेहमी वेगवेगळ्या मुद्यांवर आपले मत व्यक्त करत असतात. ते राम मंदिर भूमिपूजनाबाबत बोलले होते की, या कार्यक्रमात पावणे दोनशे लोक सहभागी होतील.

महत्त्वाच्या बातम्या-

आदिवासी मुले, महिलांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची घोषणा

न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर झळकले भगवान श्रीराम आणि राम मंदिराचे फोटो!

देशात कोरोनाचा प्रकोप, गेल्या 24 तासांतली धक्कादायक आकडेवारी

कोविड रूग्णालयात भीषण अग्नितांडव!; 8 कोरोना बाधीत रूग्णांचा होरपळून मृत्यू

भूमीपूजन सोहळा पार पडताच शिवसेनेची मोठी घोषणा, संजय राऊतांना केलं ऐलान…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या