बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ती लिव्ह इन रिलेशनमधून बाहेर पडली, फोनही उचलेना, त्यानं केलं अत्यंत किळसवाणं कृत्य!

लखनऊ | आजकालच्या तरुण तरुणींचे प्रेमसंबंध हे प्रचंड प्रमाणात लिव्ह इन रिलेशनशिपमध्येे असतात. काही नाते टिकतात आणि लग्नात रुपांतरीत होतात तर काही नाती काही काळाने तुटतात. अशातच उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधात असलेल्या तरुणीने काही कारणास्तव आपलं नात संपवलं. त्यानंतर तिच्या प्रियकराने केलेल्या कृत्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

श्रावस्ती जिल्ह्यातील भूतनाथ येथील गर्ल्स हाॅस्टेलमध्ये संबंधित तरुणी राहते. यादरम्यान आर्यनगरचा रहिवासी असलेला तरुण अभिषेक सोबत संबंधित तरुणीची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्याच मैत्रीचे नंतर प्रेमात रुपांतर झालं. त्यांच्या या प्रेमसंबंधांमुळे ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला लागले. मात्र त्यांच्या या नात्याची माहिती तरुणीच्या कूटुंबियांना मिळाली.

तरुणीच्या कुटुंबियांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिच्या प्रेमाला नकार दिला. यामुळे तरुणी आपल्या प्रियकराला सोडून दुसरीकडे एकटी राहू लागली. त्यानंतर अभिषेक तिला वारंवार फोन करुन त्रास देऊ लागला. म्हणून तरुणीने त्याचा नंबर ब्लॅकलिस्टला टाकला. मात्र आपल्याला सोडल्याचा आणि इग्नोर केल्याचा अभिषेकला प्रचंड राग आला. याच रागातून अभिषेकने तरुणीचं फेसबुक हॅक केलं. त्यानंतर तिच्या फेसबुकवरुन अश्लील व्हिडीओ आणि फोटो शेअर केले.

दरम्यान, या प्रकारानंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. तरुणीने गाझीपूर कोतवालीला जाऊन अभिषेक विरोधात तक्रार नोंद केली. तसेच त्याच्यावर अनेक कलमांअंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाचा सायबर सेल मार्फत तपास सुरु आहे.

थोडक्यात बातम्या-

रविवारपासून या ‘चार’ भागात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

‘थोडी तरी लाज बाळगा’; परदेशी गेलेल्या सेलिब्रिटींना नवाजुद्दीनने झापलं

यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत, आता ‘जन की बात’ करा- राहुल गांधी

प्रसिद्ध गीतकार हरेंद्र जाधव यांचं निधन; वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोरोना आपल्या संयमाची परीक्षा घेत आहे, घाबरून जाऊ नका- नरेंद्र मोदी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More