महाराष्ट्र मुंबई

“अंबानी, अदानी हे दोन उद्योगसमूह शेतीच्या ठेकेदारीत घुसतील आणि भविष्यात शेतकरी भिकेला लागेल”

मुंबई | शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेनं केंद्र सरकारवर टीका केली आहे. भाजपचे केंद्रीय सरकार शेतकऱ्यांना देशद्रोही, दहशतवादी ठरवून मारत आहे. मधल्या काळात बैठक बैठक खेळण्याचा दमदार खेळ सुरूच असल्याची टीका शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.

शेतकऱ्यांची घोर फसवणूक नव्या कृषी कायद्यांच्या अधीन झाली आहे. अंबानी, अदानी हे दोन उद्योगसमूह शेतीच्या ठेकेदारीत घुसतील व भविष्यात शेतकरी भिकेला लागेल, असं शिवसेनेनं म्हटलंय.

पंजाब, हरयाणातील रिलायन्स जिओ कंपनीच्या टॉवर्सची शेतकऱ्यांनी तोडफोड करून टाकली. आता रिलायन्स कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे की, आमच्या कंपनीला शेतीवाडीच्या धंद्यात अजिबात रस नाही. अंबानींपाठोपाठ असा खुलासा आता अदानी उद्योगसमूहाने केला तर दिल्लीच्या धगधकत्या सीमा शांत होतील, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

सरकारला किमान माणुसकी असती तरी कृषी कायद्यांना तात्पुरती स्थगिती देऊन शेतकऱ्यांच्या जिवाशी सुरू असलेला खेळ थांबवला असता, असं म्हणत शिवसेनेनं केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या-

“पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग दाखवू

MPSC, UPSC परीक्षांसदर्भात महत्त्वाची बातमी, वाचा सविस्तर माहिती

“मतदारवर्ग घसरल्याने शिवसेनेला खमंग ढोकळ्याची आठवण”

रोटन टाटा असा उल्लेख करत सुब्रमण्यम स्वामी यांची रतन टाटांवर टीका, म्हणाले…

‘या’ तारखेपासून देशात कोरोना लसीकरणाला प्रारंभ!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या