बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…हीच माझ्या वाढदिवसाची खरी भेट असेल’; आदित्य ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन

मुंबई | पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी देशात आणि राज्यात असलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. तसंच शिवसैनिकांना असतील त्या ठिकाणाहूनच शुभेच्छा देण्याची आदित्य ठाकरेंनी विनंती केली आहे.

13 जूनला माझा वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी माझा वाढदिवस साजरा न करण्याचं ठरवलं आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जिथे असाल, तिथूनच मला आशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्यात, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

माझी तमाम शिवसैनिक, मिंत्रमंडळी आणि सर्वांना विनंती आहे की होर्डिंग्ज, हार तुरे, केक हा सर्व खर्च टाळून तुम्ही करोनाच्या संकटात अडकलेल्या लोकांवर खर्च करा अथवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्या, माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे एक सत्कार्य होईल आणि याचा मला निश्चितच आनंद होईल, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.

दरम्यान, जसे तुम्ही मला आजपर्यंत प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत तसेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद यापुढेसुद्धा माझ्यासोबत राहतील हीच अपेक्षा, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

ट्रेंडिंग बातम्या-

मी खरंच भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे सहकारी मिळाले- राज ठाकरे

‘मौनेंद्र मोदी काही सांगतही नाहीत आणि…’; भारत-चीन सीमाप्रश्नावरुन काँग्रेस नेत्याचा मोदींना टोला

महत्वाच्या बातम्या-

लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, गर्दी करु नका स्वतःची काळजी घ्या- उद्धव ठाकरे

सरकारचा ढिसाळ कारभार चालू असताना आपण शांत बसून कसं राहणार?- चंद्रकांत पाटील

भारतानं अमेरिकेला साथ दिली तर…; चीनची भारताला धमकी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More