बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंडियन टीमच्या ‘गब्बर’ची बॉलिवूडमध्ये एंट्री, शिखरच्या नव्या इनिंगला लवकरच सुरूवात होणार

मुंबई | टीम इंडियाचा गब्बर अर्थात इंडियन क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) क्रिकेटच्या मैदानाप्रमाणे सोशल मीडियावरही सक्रिय असतो. शिखर धवन त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नेहमी रिल्स शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसतो.

आपल्या दमदार खेळीने मोठा चाहता वर्ग निर्माण करणारा गब्बर लवकरच बॉलिवूडमध्ये (Bollywood) एंट्री करणार आहे. एका अहवालानुसार, शिखर धवन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून त्यानं त्याच्या वाट्याचं शुटींग देखील पूर्ण केलं आहे.

शिखर धवन या चित्रपटात कॅमिओ रोल अर्थात पाहुणा कलाकार म्हणून नाही तर महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या रोलसाठी शिखर योग्य असल्याचं निर्मात्यांना वाटल्यानंतर त्यांनी शिखरशी संपर्क साधला. शिखर धवनला जेव्हा हा रोल ऑफर करण्यात आला तेव्हा तो त्याने आनंदाने स्विकारला.

दरम्यान, गब्बरच्या बॉलिवूडमधील पहिल्या चित्रपटाबाबत जाणीवपूर्वक गुप्तता बाळगली जात असल्याची माहिती समोर येत आहे. तर हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार असून शिखरला अभिनेत्याच्या रूपात पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! रूपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल

शिवसेनेनं दुसरा उमेदवार जाहीर करताच संभाजीराजेंनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

शिवसेनेचा संभाजीराजेंना जोर का झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

‘स्मृती ईराणींवर केलेला हल्ला भ्याड, आता आम्हीही…’; देवेंद्र फडणवीस संतापले

धक्कादायक! प्लास्टिक सर्जरी जीवावर बेतली, सर्जरी दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More