बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राणे कुटुंबीय म्हणजे येड्यांची जत्रा”

मुंबई | नारायण राणे यांनी मोदी सरकारमध्ये स्थान देण्यात आलं. त्यानंतर शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात वाद समोर येऊ लागला. जनआशीर्वीद यात्रेवेळी नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून शिवसेना आणि राणे कुटुंबीय आमने सामने आल्याचं पहायला मिळतंय. त्यातच आता शिवसेनेने पुन्हा राणे कुटुंबावर निशाणा साधला आहे.

सात तारखेचं नेमकं काय झालं हे पहिलं सांगितलं पाहिजे होतं. सात तारखेला मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते येणार होते. आता काल तारीख अधिकृत जाहीर झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना फोन गेला. मी आधीही म्हटलो होतो, शिवसेना म्हणजे वेड्यांची जत्रा आहे. स्वत:च्या मुख्यमंत्र्यांना वेडं बनवण्याचं काम हे लोक करतायेत, अशी टीका नितेश राणे यांनी केली होती. नितेश राणेंच्या टीकेला शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राणे काँग्रेसमध्ये होते तेव्हा आरएसएसला शिव्या द्यायचे. भाजपमध्ये गेल्यावर भाजपला शिव्या देण्याचं काम करतायेत. आता मंत्री झाल्यावर शिवसेनेवर टीका करण्याचं काम करतायेत. त्यामुळे राणेंना कुठलीही आयडोलाॅजी राहिली नाही. त्यामुळे राणे कुटुंबीय म्हणजे येड्यांची जत्रा झालीय, अशी जहरी टीका वैभव नाईक यांनी केली आहे.

दरम्यान, आता सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून शिवसेना आणि राणे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. येत्या 9 तारखेला नारायण राणे आणि मुख्यमंत्री आमने सामने येणार आहेत. त्यानंतर आता हा वाद कितपत वाढतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

बिहारमध्ये दोन तरूण नेत्यांची भेट; दिल्लीतील नेत्यांच्या भुवया उंचावल्या

बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव नाही तर….- देवेंद्र फडणवीस

जगात जे काही सर्वोत्तम आहे, ते मुंबईला देण्याचा प्रयत्न- आदित्य ठाकरे

तालिबानविरोधात भारत ठरणार किंगमेकर???; दोन महासत्तांनी भारताकडे मागितली ‘ही’ मोठी मदत

‘मुजोर माजी मंत्रिपुत्राच्या मुसक्या आवळा’; स्वाभिमानीचे गृहमंत्र्यांना निवेदन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More