बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेकडून व्हिप जारी; विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता!

मुंबई | काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. विधानसभा अध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा होऊ लागली. महाराष्ट्रात तीन पक्षांचं मिळून सरकार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद आधी काँग्रेसकडे होतं आता ते कोणत्या पक्षाकडे जाणार यासाठी रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवसेनेनं आपल्या आमदारांना व्हिप जारी केला आहे. त्यामुळे येणारे दोन दिवस सभागृहात सर्वांनी उपस्थित राहणं महत्त्वाचं असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच आज सकाळी दहा वाजता काँग्रेस पक्षातर्फे विधानभवनात आमदारांची एक महत्वपुर्ण बैठक बोलवण्यात आली आहे.

नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर दुसरा विधानसभा अध्यक्ष कोण होणार? यावरून चर्चा रंगत असतानाच नाना पटोले यांनी स्वतः तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्र येऊन यावर योग्य तो निर्णय घेतील अशी माहिती दिली होती. भाजपने या सर्व प्रकरणात महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे.

विधानभवनात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आजचा दिवस विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून चर्चिला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अगोदर अनेक नावांचा विचार झाला. परंतु, राजकीय नेत्यांनी केलेल्या विरोधामुळे विधानसभा अध्यक्ष निवडणे शक्य झाले नाही. पण आता निवडणुकीतून नवा विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभेला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

थोडक्यात बातम्या –

“सगळी सोंगं जमतील पण पैशाचं नाही, याचं भान अजितदादांनी ठेवलं, ते कौतुकास पात्र”

मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात यावा; ‘या’ नेत्याने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

“हे सरकार नसून दरोडेखोरांची टोळी आहे, यांच्यापासून देशाला वाचवावं लागेल”

मुलाच्या नाकातून येणारा वासावर सर्जरी केल्यानंतर डाॅक्टरांना देखील बसला धक्का!

तक्रार करण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत पोलिसांनी केलं धक्कादायक कृत्य!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More