बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नितेश राणेंच्या जुळवून घेण्याच्या वक्तव्यावर शिवसेनेने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई | भाजपचे नेते नितेश राणे यांच्यात आणि ठाकरे सरकारमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून आरोप-प्रत्यारोपांची खेळी सुरूच असते. परंतू अश्चर्याचीबाब म्हणजे सिंधुदूर्गमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सागररत्न बाजपारपेठेच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये नितेश राणेंनी शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचे संकेत दिले आहे.

नितेश राणे यांनी राज्याच्या विकासासाठी आणि पक्षाच्या नेतृत्वाने आदेश दिल्यास खांद्याला खांदा लावून काम करू. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी राज्यात युतीची चर्चा सुरु होती. ती नंतर बंद झाली. पण आता भाजप आणि शिवसेनेचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याने युतीचे चाहते सुखावले असतील. आज रात्री त्यांना चांगली झोप लागेल, असंही राणेंनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेने प्रतिक्रिया दिली आहे.

कार्यक्रमाच्यावेळी नितेश राणे यांनी विकासात सर्वांनी एकत्र असलं पाहिजे असं म्हटलं आहे. ही भूमिका आम्हाला मान्य आहे. पण नितेश राणेंना शिवसेना आणि भाजप एकत्र येऊ शकेल असं वाटत असेल तर त्यांनी प्रतीविधानसभा घेतली तेव्हा काय-काय वक्तव्य केलीत हे पाहिलं पाहिजे ,असं दीपक केसरकरांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरेंचा डीएनए तपासला पाहिजे असं म्हणणं योग्य आहे का? हे चरित्रहनन असून साध्या कुटुंबीतील व्यक्तीनेही सहन केलं नसतं. त्याचप्रमाणे संबंध एकतर्फी कधीच सुधारत नाहीत. त्यांनी आपली वक्तव्यं तपासून पाहिली पाहिजेत, असंही केसकर म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“राज्यात आघाडी सरकारला धोका नाही, सरकार आपला कार्यकाळ पुर्ण करेल”

सहकार खातं शहांकडे गेल्याने घाबरण्याचं कारण नाही- संजय राऊत

रेशनवरील तांदूळ घोटाळा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप, म्हणाले…

लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार!

‘मी अभिनेता आहे पाॅर्नस्टार नाही’, किसींग सिनमुळे पारसचा वेब सिरीजला नकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More