Top News

अविश्वास प्रस्तावावेळी तटस्थ राहा; उद्धव ठाकरेंचा शिवसेना खासदारांना आदेश

मुंबई | भाजप सरकारच्या विरोधात अविश्वास ठरावावर संसदेत आज मतदान होणार आहे. त्यावेळी शिवसेना मतदान करणार नसल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

विरोधकांनी भाजप सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला आहे. त्या ठरावावर आज संसदेत मतदान होणार आहे त्यामुळे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान, शिवसेना मतदान करणार नसून तटस्थ राहणार असल्यामुळे शिवसेना काय भूमिका घेणार? या प्रश्नाला पुर्णविराम मिळालेला आहे. मात्र तटस्थ भूमिका घेऊन शिवसेना नेमकं काय साध्य करणार? हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-नागपूरमध्ये अधिवेशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी विदर्भवासियांच्या तोंडाला पानं पुसली!

-सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची खडाजंगी; सभापतीही वैतागले

-अविश्वास ठरावाच्या अगोदर सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?

-अविश्वास ठरावावर बोलण्यासाठी कोणत्या पक्षाला किती वेळ???

-विश्वासदर्शक ठरावाआधीच शिवसेनेनं भाजपचं ‘टेन्शन’ वाढवलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या