पुणे महाराष्ट्र

मावळमध्ये भाजपला नकोसे झालेत शिवसेनेचे श्रीरंग बारणे!

पुणे | मावळमधल्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे भाजप कार्यकर्त्यांना नकोसे झाले आहेत. भाजपच्या नगरसेवकांनी बारणे यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी पक्षाकडे गळ घातली आहे. 

या सर्व प्रकरणावरून असं पाहायला मिळत आहे की, राज्यात भाजप आणि शिवसेनेतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला भाजपच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवला आहे.

खासदार बारणे यांची लोकसभा उमेदवारी रद्द करण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लेखी निवेदन पाठवलेलं आलं आहे. बारणेंचा पराभव झाला तर आम्ही जबाबदार नाही, असंही त्या नगरसेवकांनी गडकरींना सांगितलं आहे. 

दरम्यान, श्रीरंग बारणे जर निवडणूकीत उभे राहिले तर आम्ही त्यांना मतदान करणार नाही असा पवित्रा भाजपच्या नगरसेवकांनी घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातली पहिली प्रचारसभा यवतमाळमध्ये?

हिंमत असेल तर निवडणुकीला उभं राहून दाखव, संजय काकांचं पडळकरांना खुलं आव्हान

“वेळेला आणि वेळेच्या शेवटी आम्ही दोघे भावंडं कायम सोबत असतो”

साताऱ्यात उदयनराजेविरोंधात शिवसेना डरकाळी फोडणार!

-सुप्रिया सुळे अमित शहांवर भलत्याच संतापल्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या