राष्ट्रवादीविरोधात केलेली बंडखोरी भोवली, ‘या नेत्याची शिवसेनेतून हकालपट्टी
पंढरपूर | पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे लोकप्रिय दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी त्यांचे सुपूत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तर त्यांच्या विरूद्ध भाजपने समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपची प्रतिष्ठेची लढाई ठरत आहे. तर त्याचवेळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्याने राष्ट्रवादीविरूद्ध बंडखोरी केली आणि भगीरथ भालके यांच्याविरूद्ध उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्व अलबेल आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका शैला गोडसे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्याविरूद्ध उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादीविरूद्धच बंड केलं की काय? अशी चिंता व्यक्त केली जात होती. परंतु शिवसेनेनं लगेच शैला गोडसे यांच्या हाती नारळ दिला आणि पक्षातून काढून टाकलं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
महाविकास आघाडीच्या सर्व घटकांचा भगीरथ यांना आशीर्वाद लाभला आहे. जेव्हापासून महाविकास आघाडी आली आहे तेव्हापासून भाजपला कुठेही विजय मिळवता आला नाही. सगळे एकत्र आले की भाजपचा पराभव होतो, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावर चंद्रकांत पाटील यांनीही जयंत पाटलांना प्रतिउत्तर दिलं होतं.
दरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान अवताडे या दोघांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. ही पोटनिवडणूक भाजप आणि राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. ही पोटनिवडणूक 17 एप्रिलला होणार असून या निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी जाहीर करण्यात येईल.
थोडक्यात बातम्या-
पाणी जपून वापरा! ‘या’ कारणाने पिंपरी-चिंचवडकरांना दोन दिवस मिळणार नाही पाणी
जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता
शिवसेनेकडून नव्या प्रवक्त्यांच्या नावांची घोषणा, ‘या’ 16 जणांना मिळाली संधी
मिठाच्या खड्यावरुन राजकारण तापलं; सामनाच्या अग्रलेखातून अजित पवारांना कानपिचक्या
शिवसेना का सोडली?; नरेंद्र पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.