हिंमत असेल तर स्वत: मैदानात उतरा; आढळरावांचं वळसे पाटलांना आव्हान!

शिरूर | हिंमत असेल तर स्वत: मैदानात उतरा, कोणा टिंगु-मुंगूला पुढे करु नका, आपण समोरा समोर बोलू, असं आव्हान खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दिलीप वळसे पाटील यांना केलं आहे. ते कार्यक्रमात बोलत होते.

लोहगाव एवढ्याच विमानतळापेक्षा मोठे विमानतळ हे पुणे शहर-जिल्ह्याच्या वाढत्या व्यापानुसार आवश्यक असल्याने छोट्या विमानतळाचा प्रस्ताव केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाने  नाकारला, हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना माहि असताना वळसे पाटीलांना हे ठाऊक नाही म्हणजे हा आमदार डोक्यावर पडलाय, असं मला वाटतंय, असंही ते यावेळी म्हणाले.

१५ वर्षे केंद्र आणि राज्यात सत्ता असतानाही चाकण-विमानतळ पुरंदरला गेल्याला वळसे पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला. 

महत्त्वाच्या बातम्या-

-शरद पवार मराठवाड्यातून फुंकणार निवडणुकांचं रणशिंग?; कार्यकर्ते लागले तयारीला

-देशाचे चौकीदार म्हणवून घेणारे चोर निघाले; राहुल गांधींचा मोदींवर गंभीर आरोप

-गणपती विसर्जनात डीजे लावला तर कारवाई होणारच- विश्वास नांगरे पाटील

-2019 आम्हीच जिंकणार आणि उदघाटनाला मीच येणार; नरेंद्र मोदींचा दावा

-आपलं ठेवायंच झाकून अन् दुसर्‍याचं बघायचं वाकून; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या