बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शिवाजी महाराज ओबीसी होते’; महादेव जानकरांचं वादग्रस्त वक्तव्य

परभणी | छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याचा अवमान करण्यात आल्याची घटना सदाशिवनगर बंगळुरु येथे घडली होती. यावरून महाराष्ट्रातही चांगलच राजकारण  पेटल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. त्यातच आता रासपचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

महादेव जानकर यांनी “शिवाजी महाराज ओबीसी होते,” असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. परभणी येथे ओबीसी आरक्षण कृती समितीतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. बंगळुरू येथील घटना ताजी असतानाच जानकरांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारच्या मागणीची याचिका न्यायालयाने फेटाळली होती. याशिवाय न्यायालयानं केलेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.

दरम्यान, बंगळरूच्या घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी अनेक शिवप्रेमींचा रोष ओढवून घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ही शुल्लक गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तर चंद्रकातं पाटील यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सर्वधर्म समभावाची नाही, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

TET घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट, आणखी एका बड्या अधिकाऱ्याला अटक

सोनं-चांदी दरात घसरण; वाचा आजचे ताजे दर

“वेळ पडल्यास शिवसेनेमध्ये नाराज असलेल्यांना घेऊन निवडणूक लढवू”

“21 वर्षाखालील मुलगा लग्न करु शकत नाही मात्र लिव्ह-इनमध्ये राहण्यास परवानगी”

TET घोटाळा: “सुपेंवर महाविकास आघाडी सरकारचा वरदहस्त,नाहीतर हे शक्यच नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More