सातारा | जावळीचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यामुळे साताऱ्यात चर्चांना उधाण आलं आहे.
माण-खटावचे नेते अनिल देसाई यांच्या आईचं निधन झालं. त्यानंतर चंद्रकांत पाटील देसाई कु़टुंबियांना भेटायला गेले होते. त्यावेळी शिवेंद्रराजेंनी त्यांची भेट घेतली. त्यांनी मतदारसंघातल्या रस्त्याबाबतचे आणि जलयुक्त शिवाराच्या कामाचं निवेदन दिलं.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साताऱ्यात होते. विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकरांसह राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांनी पवारांची भेट घेतली. मात्र शिवेंद्रराजे पवारांना भेटायला गेले नसल्याने साताऱ्यात बऱ्याच चर्चा रंगल्या.
दरम्यान, आपण कुणावरही नाराज नसून बाहेर गावी असल्याने पवारांना भेटलो नसल्याचं स्पष्टीकरण शिवेंद्रराजेनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-…नाहीतर बाळासाहेब ठाकरे स्टाईल आंदोलन करेन; ‘या’ नेत्याचा इशारा
–भाजप मालामाल; तर काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळाल्या इतक्या कोटींच्या देणग्या
-मोदींविरोधात बोलल्याने माझ्या पतीला जन्मठेप”
-…म्हणून कंगना राणावतवर मीडियाचा बहिष्कार!
-राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची भावाविरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी