बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये आहेत, ते भाजप सोडून गेले नाहीत”

सातारा | जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे(Dnyandev Ranjane) विजयी झाले आहेत. ज्ञानदेव रांजणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे(Shashikant Shinde) यांचा पराभव केला आहे. त्यातच आता ज्ञानदेव रांजणे यांचा भाजपकडून सत्कार करण्यात आला. सत्कारसमारंभा प्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) बोलत होते. रांजणे यांची शिवेंद्रसिंहराजे यांनी घेतलेली भेट ही सदिच्छा भेट होती, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

भाजपचे सरकार सध्या राज्यात नाही. गेल्या दोन वर्षांपासून शिवेंद्रसिंहराजे भोसले(Shivendrasinharaje Bhosle) भाजप सोडतील अशा अफवा आहेत. मात्र, शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजपमध्ये चांगलं काम केले आहे. ते भाजप सोडून गेले नाहीत. हे त्यांचे मोठेपण आणि भाजपचे यश आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

जिल्हा मध्यवर्ती बॅंके निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करत रांजेणे यांनी मिळवलेला हा विजय महत्त्वपुर्ण आहे. त्यामुळेे त्यांचा सत्कार करण्यासाठी आलो होतो. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, अशी भावना आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ज्ञानदेव रांजणे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव केला. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यासाठी मुद्दाम आलो आहे. तसेच सामान्य कुुटूंबातील रांजणे यांचा हा विजय महत्त्वपुर्ण असल्याने त्यांचा  सत्कार भाजपच्या वतीने करण्यात आला, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. मी विद्यार्थी चळवळीतून पुढे आलो असल्याने संघर्ष करणाऱ्या व्यक्तींचे मला अप्रुप आहे, असं त्यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“भाजप आता राज्यात 1 नंबरचा पक्ष बनलाय”

‘2 नंबरी सरकारची 2 वर्ष…’, चित्रा वाघ यांची कवितेतून टीका

परमबीर सिंह आणि सचिन वाझेंच्या ‘त्या’ भेटीविरोधात गृहमंत्र्यांनी उचललं मोठं पाऊल

“मंत्र्यांच्या ड्रायव्हरला 40 हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला 12 हजार पगार”

‘शेतकऱ्यांच्या झाडांना प्रत्येकी 20 रुपये एवढी प्रचंड मदत केली’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More