बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

छत्रपतींच्या जयघोषाने रायगड दुमदुमला; महाराष्ट्रभर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह

रायगड | स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 346 वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने संपूर्ण रायगड दुमदुमला.

दरवर्षी प्रमाणे हजारोंच्या संख्येने शिवभक्तांनी रायगडावर हजेरी लावली. खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सकाळीच रायगडावर हजेरी लावून महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

सकाळी साडे नऊ वाजता महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. 10 वाजून 10 मिनीटांनी महाराजांना सुर्वण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला.

महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकांमध्ये तलवार, दंडपट्टा, भाला यांचे सादरीकरण करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

-खासदार उदयनराजे भोसले राज्याभिषेकादिनी महाराजांच्या चरणी नतमस्तक

-गडकरींबाबत अपशब्द वापरणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पक्षाकडून मिळाली ‘ही’ शिक्षा!

-मागणी वगैरे नाही तर ‘या’ पदावर आमचा नैसर्गिक हक्क; संजय राऊत आक्रमक

-मोदी सरकारचं ‘मिशन रोजगार’; उचललं ‘हे’ मोठं पाऊल

-शिवसेनेसाठी खूशखबर!!! भाजप देणार ‘हे’ महत्त्वाचं पद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More