बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसैनिकाची ऐनवेळी मास्कमुळे तारांबळ, व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई | उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहेत. यंदाच्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना पुर्ण ताकदीने उतरलेली पाहायला मिळत आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार धैर्यशील माने व अनेक शिवसेना नेते जोरदार प्रचार करताना दिसत आहेत.

उत्तर प्रदेशातील शिवसेनेच्या जाहीर सभेचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. खासदार धैर्यशील माने यांच्या जोरदार भाषणावेळी मागे थांबलेल्या एका शिवसैनिकाला मास्कच घालता येत नव्हता. त्या शिवसेना पदाधिकाऱ्याला प्रयत्न करूनही मास्क लावता येत नव्हता.

जवळपास दोन मिनिटे शिवसेना पदाधिकाऱ्याने मास्क लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या शिवसैनिकाला मास्कची रचनाच लक्षात येत नव्हती. बराच प्रयत्न करूनही मास्क लावता येत नसल्याने शेवटी समोरच्या व्यक्तीकडून मास्कबद्दल समजून घेतलं आणि मास्क लावला. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी हा व्हिडीओ शेअर करत शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. हे चींदीचोर मास्क घालू शकत नाही पण नशिबाने बसले सरकार चालवायला, असा खोचक टोला निलेश राणेंनी लगावला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

अमृता फडणवीसांचं ‘तांडव’, नवं गाणं होतंय तुफान व्हायरल

पंतप्रधान मोदींचा राष्ट्राध्यक्ष पुतीनला फोन, दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

“या सरकारने राजीनामा दिला पाहिजे, एका देशद्रोही व्यक्तीला मंत्री म्हणून…”

 “ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या”

“आघाडी सरकारमधील नेते स्वत:च सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावतील”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More