Top News

‘काँग्रेसला उत्तरे देण्यापेक्षा चीनला प्रत्युत्तर द्यावं’; शिवसेनेचा मोदींना सल्ला

मुंबई | सीमेवरील गलवान खोर्‍यात चीनची घुसखोरी, बेकायदा बांधकामे सुरुच आहेत. त्यांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी सरकार पक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षालाच सडेतोड उत्तरे देत बसला आहे, असा टोला शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावला आहे.

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून केंद्र सरकारला अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. तर भाजपकडूनही काँग्रेसवर सडकून टीका करण्यात आली. मात्र, सध्या केंद्र सरकारने काँग्रेसला उत्तरे देण्यापेक्षा चीनला प्रत्युत्तर द्यावे, असा सल्ला शिवसेनेनं अग्रलेखातून सरकारला दिलाय.

कोरोना कॉलर ट्यूनचा लोकांना कंटाळा आला आहे तसा चीनप्रकरणी भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या ट्यून युद्धाचाही कंटाळा आला आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

आपल्याला चीनशी लढायचे आहे, सरकारच्या विरोधकांशी नाही’ अशी एक कॉलर ट्यून कोणीतरी दिल्लीत सतत वाजवायला हवी, असा टोला अग्रलेखातून सरकारला लगावण्यात आला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात कोरोनाचं थैमान, जिल्हाधिकाऱ्यांच्या डॉक्टरांना या महत्त्वाच्या सूचना

जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार, आरोग्यमंत्र्यांचा दावा

महत्वाच्या बातम्या-

59 चिनी अ‍ॅपवर बंदी घातल्याने भारतातील ‘इतके’ हजार कर्मचारी होणार बेरोजगार!

गुड न्यूज! कोरोनावरील पहिली लस भारतात तयार

मुंबईत विनामास्क फिरल्यास भरावा लागणार ‘इतका’ दंड; पालिकेकडून आदेश जारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या